¡Sorpréndeme!

सिंचन घोटाळा: 4 गुन्हे दाखल मोठ्या नेते मंडळींवर कायद्याचा बडगा | Lokmat News

2021-09-13 191 Dailymotion

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळ्या प्रकरणी नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज चार गुन्हे दाखल केले असून सरकारचा हा 'मास्टरस्ट्रोक' विरोधकांची गोची करणारा ठरणार आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी जल संपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावर आरोप झाले होते. आता याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने राष्ट्रवादीच्या या दोन्ही बड्या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विदर्भ पाटबंधारे विकास महा मंडळांतर्गत येणाऱ्यागोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामांच्या निविदा प्रक्रिये दरम्यान गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गृह विभागाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
1. मोखाबर्डी उपसा सिंचन अगयोजनेच्या नवतळा, मेटेपार, चिखलापार कालव्याचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणात नियमबाह्य पद्धतीने निविदा मूल्यवाढ करणे, आधीच्या अपात्र कंत्राटदारांना पुन्हा पात्र ठरवणे, निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांशी संगनमत करणे, अवैध निविदा मंजूर करणे अशी कामे झाली आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews